1 त्यानंतर स्वर्गातून दुसरा एक देवदूत खाली उतरतांना मी पाहिला. त्याला मोठा अधिकार देण्यात आला होता. त्याच्या प्रखर तेजाने पृथ्वी उजळून निघाली.
2 तो देवदूत मोठ्याने ओरडून म्हणाला:
3 तिच्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य
4 मग मी स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी ऐकली, ती म्हणाली:
5 कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत उंच गेली आहे,
6 तिने जसे तुम्हाला केले, तसेच तिला करा;
7 तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे,
8 म्हणूनच तिला मरण,
9 “पृथ्वीवरील ज्या राजांनी, तिच्याबरोबर व्यभिचार केला व तिच्या विलासामध्ये सामील झाले होते. ते तिच्या पीडेच्या भयामुळे दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील,
10 तेव्हा ते तिच्याकरिता ऊर बडवून शोक करतील. ते म्हणतील:
11 “पृथ्वीवरील व्यापारी तिच्यासाठी रडून शोक करतील, कारण आता त्यांचा माल विकत घेण्यास कोणीच उरले नाही:
12 सोने, चांदी, हिरे, रत्ने, तलम कापड, जांभळे आणि किरमिजी रेशमी कापड, सर्वप्रकारचे चंदनी व सुगंधी लाकूड, हस्तदंती माल, मोलवान लाकडाचे कोरीव नक्षीकाम, कास्य, लोखंड, संगमरवरी दगड,
13 तसेच दालचिनी व मसाले, उटणी, धूप, अत्तर, ऊद, द्राक्षारस, जैतुनाचे तेल, उत्तम सपीठ व गहू, गुरे, मेंढरे, घोडे, रथ, गुलाम म्हणून विकण्यात येणारे लोक.
14 “ते म्हणतील, ‘ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापासून घेतली गेली आहेत, सर्व विलास आणि वैभवी गोष्टी तुझ्यापुढून गेली आहेत; त्याचा तुला कधीच पुनर्लाभ होणार नाही.’
15 जे व्यापारी तिला हे पदार्थ विकून श्रीमंत झाले, ते आता तिची पीडा बघून भयभीत होतील. दूर उभे राहून रडत व शोक करतील.
16 ते आक्रोश करून म्हणतील:
17 एका क्षणात तिची सर्व संपत्ती नष्ट झाली!’
18 धुराच्या उसळणार्या लोटांकडे पाहत शोकाकुल होऊन ते रडत म्हणतील, ‘या महान नगरीसारखी दुसरी नगरी सर्व जगात शोधून तरी सापडेल काय?’
19 मोठ्या दुःखाने आपल्या डोक्यात धूळ टाकून ते रडत व आक्रोश करीत म्हणतील:
20 “पण हे स्वर्गा!
21 मग एका बलवान देवदूताने, जात्याच्या तळीच्या आकाराचा एक मोठा दगड उचलून समुद्रात टाकला व तो ओरडून म्हणाला:
22 त्या नगरीत आता कर्णे, वीणा, बासरी,
23 दिव्यांचा प्रकाश यापुढे
24 पृथ्वीवर सांडलेले सर्व संदेष्टे आणि पवित्रजन,