Apocalipse 15

MARC

1 आणि मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह पाहिले: अखेरच्या सात पीडा घेतलेले सात देवदूत. त्या पीडानंतर परमेश्वराचा क्रोध समाप्त झाला.

2 मग माझ्यासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी मी पाहिले. पहिला पशू, त्याची मूर्ती, त्याची खूण व त्याच्या नावाची संख्या, या सर्वांवर विजय संपादन केलेले सर्वजण, काचेच्या समुद्राच्या किनारीवर उभे होते. सर्वांच्या हातात परमेश्वराने दिलेल्या वीणा होत्या.

3 ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते:

4 हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही,

5 मग मी पाहिले, तो स्वर्गातील मंदिराचे साक्षीचे परमपवित्रस्थान उघडलेले मला दिसले.

6 ज्यांना पृथ्वीवर सात पीडा ओतण्याचे काम नेमून देण्यात आले होते, ते सात देवदूत त्या मंदिरातून बाहेर आले. त्यांनी डागविरहीत आणि तेजस्वी तागाची वस्त्रे परिधान केली होती; त्यांच्या छातीवर सोन्याचे पट्टे बांधले होते.

7 त्या चार सजीव प्राण्यांतील एकाने, त्या सात देवदूतांना युगानुयुग जिवंत असणार्‍या परमेश्वराच्या क्रोधाने भरलेल्या सात सोन्याच्या वाट्या दिल्या.

8 त्यांचे गौरव व सामर्थ्य यातून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.

Ler em outra tradução

Comparar lado a lado