1 Crônicas 24

MARC

1 अहरोनाच्या वंशजाची विभागणी:

2 नादाब व अबीहू हे अहरोनाचे पुत्र, ते अहरोना आधीच मृत्यू पावले होते. त्यांना पुत्र नव्हते; म्हणून याजकाचे कार्य एलअज़ार व इथामार हे करीत.

3 दावीदाने एलअज़ाराचे वंशज सादोक व इथामाराचा वंशज अहीमेलेख यांच्या मदतीने अहरोनाच्या वंशजांची विभागणी केली व त्यांची क्रमानुसार सेवेसाठी नेमणूक केली.

4 एलअज़ाराच्या वंशात इथामाराच्या वंशापेक्षा अधिक पुढारी होते आणि त्यांची त्यानुसार विभागणी करण्यात आली: एलअज़ाराच्या वंशातून सोळा कुटुंबप्रमुख आणि इथामाराच्या वंशातून आठ कुटुंबप्रमुख असे विभागण्यात आले.

5 कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.

6 लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

7 प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली,

8 तिसरी हारीम,

9 पाचवी मल्कीयाह,

10 सातवी हक्कोस,

11 नववी येशूआ,

12 अकरावी एल्याशीब,

13 तेरावी हुप्पाह,

14 पंधरावी बिल्गाह,

15 सतरावी हेजीरा,

16 एकोणविसावी पथह्याह,

17 एकविसावी याखीन,

18 तेविसावी दलायाह,

19 त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत.

20 लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती:

21 रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.

22 इसहारचे पुत्र: शलोमोथ;

23 हेब्रोनाचे पुत्र:

24 उज्जीएलाचे पुत्र: मीखा;

25 मीखाहचा भाऊ: इश्शीयाह;

26 मरारीचे पुत्र: महली व मूशी.

27 मरारीचे पुत्र:

28 महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.

29 कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल.

30 मूशीचे पुत्र: महली, एदर व यरिमोथ.

31 अहरोनाच्या संततीप्रमाणे दावीद राजा, सादोक, अहीमेलेख आणि याजकांचे व लेव्यांचे पुढारी या सर्वांसमक्ष चिठ्ठ्या टाकून कामे वाटून देण्यात आली. सर्वात ज्येष्ठाच्या कुटुंबास व सर्वात कनिष्ठाच्या कुटुंबास सारखीच वागणूक देण्यात आली.

Ler em outra tradução

Comparar lado a lado