1 हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो;
2 माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात;
3 मी जेव्हा घाबरतो,
4 मी देवाच्या मदतीने, त्याच्या वचनाची स्तुती करीन,
5 दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरित अर्थ करतात;
6 ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात,
7 त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको.
8 तू माझ्या भटकण्याची ठिकाणे मोजली आहेत
9 मी तुला हाक मारीन त्यादिवशी माझे शत्रू मागे फिरतील;
10 मी देवाच्या साहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन.
11 मी देवावर भरंवसा ठेवीन; मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करील?
12 हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे;
13 कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे;