1 त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.
2 तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही.
3 तिच्यामधले सरदार गुरगुरणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत.
4 तिचे संदेष्टे उद्धट व अविचारी आहेत.
5 परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही!
6 मी राष्ट्रांचा व त्यांच्या किल्ल्यांचा नाश केला आहे.
7 मी म्हणालो, खचित तू माझे भय धरशील! शिक्षा घेशील, तर तुझ्या संबधाने ज्या सर्व योजना ठरवल्यानुसार तुझे घर नष्ट होणार नाही! पण ते सकाळीच ऊठून आपली सर्व कामे भ्रष्ट करत असत.
8 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, “मी लूट करायला ऊठेन तोपर्यंत माझी वाट पाहा, कारण राष्ट्रे एकत्र यावी, राज्ये गोळा करावी,
9 त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी.
10 कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील.
11 त्या दिवसात तू माझ्याविरूद्ध केलेल्या सर्व कृत्यांची तुला लाज वाटणार नाही,
12 तुझ्यामध्ये मी फक्त नम्र व दीन लोकांसच राहू देईन, आणि तू परमेश्वराच्या नावात आश्रय घेशील.”
13 “इस्राएलमधील उरलेले वाईट कृत्ये करणार नाहीत व खोटे बोलणार नाहीत.
14 सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!
15 कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे!
16 त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको.
17 परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील,
18 जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन.
19 त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन,
20 त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन,