1 इस्राएलाला आशीर्वाद द्यायची परमेश्वराची इच्छा आहे हे बलामाने पाहिले. म्हणून त्याने ते कोणत्याही प्रकारचे मंत्रतंत्र वापरुन थांबवायचा प्रयत्न केला नाही. पण तो वळला आणि त्याने रानाकडे पाहिले.
2 बलामाने रानाकडे पाहिले आणि त्यास इस्राएलाचे सगळे वंश दिसले. त्यांनी आपापल्या भागात आपापल्या गटासह तळ दिला होता. नंतर देवाचा आत्मा बलामावर आला.
3 त्याने हा संदेश स्विकारला आणि म्हणाला,
4 जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो,
5 हे याकोबा तुझे तंबू,
6 खोऱ्यासारखे विस्तृत पसरलेले,
7 पाणी त्यांच्या बादलीतून वाहील,
8 देवाने त्यांना मिसरामधून बाहेर आणले.
9 तो सिंहासारखा,
10 बलामाविरूद्ध बालाकाचा राग भडकला आणि त्याने रागाने आपले हात एकत्रीत आपटले. बालाक बलामास म्हणाला, “मी तुला माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी बोलावले, पण पाहा, तू त्यांना तीन वेळा आशीर्वाद दिलास.
11 तर आता मला सोडून घरी जा. मी तुला चांगला मोबदला देईन असे म्हटले होते, परंतु परमेश्वराने तुला कोणतेही इनाम मिळण्यापासून दूर ठेवले आहे.”
12 बलाम बालाकाला म्हणाला, तूच माझ्याकडे माणसे पाठवलीस. त्या मनुष्यांनी मला येण्याबद्दल विचारले. पण मी त्यांना म्हणालो,
13 बालाक मला त्याचे सोन्या-चांदीने भरलेले घर देऊ शकेल. पण मी परमेश्वराने आज्ञा केलेल्या गोष्टीच बोलेन. मी स्वत: काहीही चांगले अथवा वाईट करु शकत नाही. परमेश्वर जेवढी आज्ञा देईल तेवढीच मी बोलतो. तुला या गोष्टी नक्कीच आठवत असतील की मी हे तुझ्या मनुष्यांना सांगितले होते.
14 तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
15 बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला,
16 हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो,
17 मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही.
18 नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल,
19 याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील,
20 नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला,
21 नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला,
22 “तरीसुद्धा केनी राष्ट्रांचा नाश होईल,
23 नंतर बलामाने अंतीम संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, देव जेव्हा असे करतो “हायहाय! जेव्हा देव हे करीत असता कोण जिवंत राहील?”
24 कित्तीमाच्या किनाऱ्यापासून जहाजे येतील;
25 नंतर बलाम उठला आणि गेला. तो आपल्या घरी परत गेला आणि बालाकही आपल्या वाटेने गेला.