Jó 41

MAR

1 तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का?

2 तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का?

3 लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का?

4 लिव्याथान तुझ्याशी करार करून

5 तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का?

6 मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का?

7 तू लिव्याथानाच्या कातडीत

8 तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस.

9 तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा.

10 एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही.

11 मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू?

12 मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी,

13 कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही.

14 लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही.

15 लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या

16 ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की

17 त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत.

18 लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते.

19 त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात.

20 उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो

21 लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.

22 लिव्याथानाची मान मजबूत आहे.

23 त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही

24 लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे.

25 लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात

26 तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात.

27 तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो

28 तो बाणांना घाबरुन पळून जात नाही

29 जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते.

30 लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे.

31 लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो.

32 लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो.

33 पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही.

34 लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado