Isaías 59

MAR

1 पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.

2 तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे.

3 कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत.

4 कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही.

5 ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात.

6 त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत.

7 त्यांचे पाय दुष्कर्माकडे धावतात, आणि निष्पाप रक्त पाडायला ते घाई करतात.

8 त्यांना शांतीचा मार्ग माहित नाही, आणि त्यांच्या वाटेत न्याय आढळत नाही.

9 यास्तव न्याय आम्हापासून दूर आहे, आणि चांगुलपणा आमच्यापर्यंत पोहचत नाही.

10 आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत.

11 आम्ही अस्वलांसारखे गुरगुरतो आणि कबुतरांसारखे फिरतो,

12 कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरूद्ध साक्ष देतात.

13 आम्ही बंड केले, परमेश्वरास नकारले आणि आमच्या देवाला अनुसरण्याचे सोडून दूर फिरलो आहे.

14 न्यायास मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे.

15 सत्य जात राहिले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात.

16 त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही.

17 त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले,

18 त्यांच्या कृत्याप्रमाणेच तो त्यांना परतफेड करील, त्याच्या शत्रूस क्रोध, वैऱ्यास प्रतिफल भरून देईल, द्वीपांना दंड म्हणून त्यांचा प्रतिफळ देईल.

19 ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल.

20 मग तारणारा सियोनेकडे येईल आणि याकोबात जे अपराधापासून वळतात त्यांच्याकडेही येईल, परमेश्वर असे म्हणतो.

21 परमेश्वर म्हणतो, त्याच्याशी माझा करार हाच आहे, माझा आत्मा जो तुझ्यात आहे आणि माझे शब्द जे मी तुझ्या मुखात टाकले, ते तुझ्या मुखातून किंवा तुझ्या संतानाच्या मुखातून किंवा तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखातून आतापासून सर्वकाळपर्यंत निघून जाणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.

Ler em outra tradução

Comparar lado a lado