1 परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा;
2 जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो.
3 जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये,
4 कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात
5 त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल.
6 जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी
7 त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन;
8 ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः
9 रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका!
10 त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही;
11 त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही;
12 ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल,