1 “तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर.
2 तू आपला तंबू मोठा कर आणि तंबूचे पडदे अधिक दूर बाहेर पसरण्याचे थांबू नको;
3 कारण उजवीकडे आणि डावीकडे तुझा विस्तार होईल,
4 घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस;
5 कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.
6 कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे,
7 मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन.
8 मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले;
9 “कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः
10 जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील,
11 अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले,
12 तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन,
13 आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.
14 नीतिमत्तेत तू स्थापीत होशील.
15 पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल.
16 पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो
17 तुझ्याविरुध्द तयार केलेले कोणतेही हत्यार सफल होणार नाही;