Isaías 5

MAR

1 मला माझ्या प्रियासाठी गाणे गाऊ द्या, माझ्या प्रियाच्या द्राक्षमळ्याविषयीचे हे गीत आहे.

2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.

3 म्हणून आता, “यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांनो व यहूदातल्या पुरुषांनो,

4 मी माझ्या द्राक्षमळ्यासाठी जे केले आहे, त्यापेक्षा मी आणखी करायला पाहीजे असते?

5 आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन.

6 मी तो उजाड करीन, त्यास खच्ची करणार नाहीत व कुदळणार नाहीत, पण तण व काटेकुटे फुटतील,

7 कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल घराणे होय.

8 जे घराला घर आणि

9 सेनाधीश परमेश्वर माझ्याशी बोलला,

10 दहा एकर द्राक्षमळा एक बाथ रस देईल, आणि एक होमर बी केवळ एक एफा उपज देईल.

11 सकाळी उठून मद्याच्या शोधास लागणाऱ्यांनो तुम्हास हाय हाय!

12 मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता

13 यास्तव माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणांत गेले आहेत,

14 यास्तव मृत्यूने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे.

15 मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत.

16 सेनाधीश परमेश्वर आपल्या न्यायात उंचावला जातो, आणि देव जो पवित्र आहे आपल्या न्यायीपणा द्वारे आपणाला पवित्र प्रकट करतो.

17 मग मेंढ्या त्यांच्या कुरणात असल्यासारखे चरतील, आणि श्रीमंतांच्या ओसाड भूमीवर कोकरे चरतील.

18 जे रितेपणाच्या दोऱ्यांनी अन्याय ओढतात आणि जे गाडीच्या दोरांनी पाप ओढतात त्यांना हाय हाय!

19 जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू,

20 जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात.

21 जे स्वत:च्या नजरेत आपणास शहाणे समजतात आणि आपल्या मताने विचारवंत आहेत त्यांना हायहाय!

22 जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय!

23 जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय!

24 यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते,

25 म्हणून परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे, आणि त्याने आपला हात, त्यांच्यावर उगारून त्यांना शिक्षा केली आहे.

26 तो दूरच्या राष्ट्रांना खूण म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शीळ वाजवील,

27 त्यांच्या मध्ये कोणीच थकलेला व ठेच लागलेला असणार नाही,

28 त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्ये वाकलेली आहेत.

29 त्यांची गर्जना जणूकाय सिंहाच्या गर्जनेसारखी असणार, तरूण सिंहासारखे ते गर्जना करतील.

30 त्या दिवशी जसा समुद्रगर्जना करतो त्या प्रमाणे ते आपल्या भक्ष्याविरूद्ध गर्जना करतील.

Ler em outra tradução

Comparar lado a lado