Isaías 44

MAR

1 तर आता याकोबा, माझ्या सेवका आणि इस्राएला, ज्या तुला मी निवडले आहे तो तू माझे ऐक.

2 ज्याने तुला निर्माण केले आणि गर्भस्थानापासून तुला घडिले, जो तुझे साहाय्य करतो तो परमेश्वर असे म्हणतो, हे याकोबा, माझ्या सेवका,

3 कारण मी तहानलेल्या जमिनीवर पाणी ओतीन आणि मी कोरड्या जमिनीवर प्रवाह वाहतील.

4 पाण्याच्या प्रवाहाजवळ जसे वाळुंज, तसे ते गवतामध्ये उगवते.

5 “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबाचे’ नाव आपणास ठेवील;

6 इस्राएलाचा राजा परमेश्वर, तिचा उद्धारक, सेनाधीश परमेश्वर म्हणतो,

7 माझ्यासारखा कोण आहे? तर त्याने जाहीर करावे आणि मला स्पष्टीकरण करावे

8 तुम्ही भिऊ नका किंवा घाबरे होऊ नका. पुरातन काळापासून मी तुला सांगितले आणि जाहीर केले नाही काय?

9 जे कोरीव मूर्ती घडवतात ते सर्व काहीच नाहीत; ज्या गोष्टीत ते आनंदीत होतात त्या कवडीमोलाच्या आहेत.

10 हे देव कोणी किंवा जी ओतीव मूर्ती क्षुल्लक आहे ती कोणी घडवली आहे?

11 पाहा, त्याचे सर्व सोबती लज्जित होतील; कारागीर तर केवळ माणसे आहेत.

12 लोहार त्याच्या हत्याराने, निखाऱ्यांवर काम करून, घडवत असतो.

13 सुतार लाकडाचे माप दोरीने रेष मारून करतो आणि गेरूने आखणी करतो.

14 तो आपणासाठी गंधसरू तोडतो, किंवा सरू वा अल्लोनची झाडे निवडतो.

15 मग मनुष्य त्याचा उपयोग सरपणासाठी आणि स्वतःला गरम ठेवण्यासाठी करतो. होय! त्याने अग्नी पेटून आणि भाकर भाजण्यासाठी करतो.

16 लाकडाचा एक भाग अग्नीसाठी जाळतो, त्यावर मांसाचा भाग भाजतो. तो खातो आणि तृप्त होतो.

17 शिल्लक राहिलेल्या लाकडाचे तो देव बनवतो, आपली कोरीव प्रतिमा घडवतो; तो त्याच्यापुढे नतमस्तक होतो व पूजा करतो,

18 त्यांना कळत नाही, किंवा त्यांना समजत नाही, कारण त्यांचे डोळे आंधळे आहेत व ते पाहू शकत नाही, आणि त्यांच्या हृदयाला आकलन होत नाहीत.

19 कोणी विचार करीत नाही किंवा त्यांना नीट समजत नाही ते म्हणतात,

20 हे जसे तो जर राख खातो; त्याचे फसवलेले हृदय चुकीच्या मार्गाने नेते. तो आपल्या जीवाला वाचवू शकत नाही किंवा तो म्हणत नाही, “माझ्या हातात धरलेल्या या गोष्टी खोटे देव आहेत.” असे तो म्हणणार नाही.

21 “हे याकोबा, आणि इस्राएला, यागोष्टीबद्दल विचार कर, कारण तू माझा सेवक आहेस.

22 मी तुझी बंडखोरीची कृत्ये, दाट ढगाप्रमाणे आणि तुझे पाप आभाळाप्रमाणे, पुसून टाकली आहेत;

23 अहो, आकाशांनो, गायन करा, तुम्ही पृथ्वीच्या खालील अधोलोकांनो आरोळी मारा;

24 तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर,

25 व्यर्थ बोलणाऱ्याचे शकून मी निष्फळ करतो आणि जे शकून वाचतात त्यांना काळिमा लावतो;

26 मी परमेश्वर! जो आपल्या सेवकाची घोषणा परिपूर्ण करतो आणि आपल्या दूतांचा सल्ला सिद्धीस नेणारा,

27 जो खोल समुद्राला म्हणतो, आटून जा आणि मी तुझे प्रवाह सुकवीन.

28 जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा मेंढपाळ आहे, तो माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करील. तो यरूशलेमेविषयी म्हणेल, ती पुन्हा बांधण्यात येईल आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.

Ler em outra tradução

Comparar lado a lado