1 त्या दिवसात, हिज्कीया आजारी पडून मरणाच्या टोकास आला होता, आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, तुझ्या घराची व्यवस्था कर; कारण तू मरणार आहेस तू जगणार नाहीस.”
2 मग हिज्कीयाने भिंतीकडे तोंड वळवले आणि परमेश्वरास प्रार्थना केली.
3 तो म्हणाला, “परमेश्वरा, मी आपल्या पूर्ण अंतःकरणाने आणि प्रामाणिकपणाने तुझ्यासमोरच चाललो, याची कृपया आठवण कर आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले ते मी करत आलो.” आणि हिज्कीया मोठ्याने रडला.
4 नंतर यशयाला परमेश्वराकडून संदेश आला, तो म्हणाला,
5 जा आणि माझ्या लोकांचा पुढारी हिज्कीयाला सांग, परमेश्वर असे म्हणतो, तुझा पूर्वज दाविदाचा, देव म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले. पाहा, मी तुझ्या आयुष्याची पंधरा वर्षे आणखी वाढवीन.
6 मी तुला आणि या नगराला अश्शूराच्या राजापासून अधिकारातून सोडवीन आणि या नगराचे संरक्षण करील.
7 आणि माझ्यापासून तुला हे चिन्ह असेल, परमेश्वर, जे मी बोलतो ते करतो.
8 पाहा, सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजाखाली गेल्यामुळे आहाजाच्या पायऱ्यांवर पडणारी सावली मी दहा पावले मागे आणीन. सूर्यास्त होताच सूर्याची सावली दहा पावले मागे जाईल.
9 जेव्हा यहूदाचा राजा हिज्कीया आजारी होता आणि त्यातून बरा झाल्यावर त्याने लिहिलेली ही प्रार्थना आहेः
10 मी म्हणालो, मी माझ्या आयुष्याच्या अर्ध्यामार्गात असता
11 मी म्हणालो की, “मी परमेश्वरास, जिवंतांच्या भूमीत परमेश्वरास आणखी पाहणार नाही;
12 माझे जीवन काढून घेतले आहे, आणि मेंढपाळाच्या तंबूप्रमाणे माझ्यापासून दूर केलेली आहे;
13 मी सकाळपर्यंत रडत राहिलो;
14 मी निळवीप्रमाणे किलबिललो; पारव्याप्रमाणे मी कुंजन केले;
15 मी काय बोलू? त्याने दोन्ही केले, तो माझ्याशी बोलला आणि त्याने ते केले आहे;
16 हे प्रभू, तू माझ्यावर दुःखे पाठवली ती माझ्या चांगल्यासाठी आहेत. माझे जीवन मला परत मिळेल;
17 माझ्या भल्यासाठीच या दुःखांचा अनुभव मला आहे.
18 कारण अधोलोक तुझे आभार मानीत नाही. मृत्यू तुझी स्तुती करत नाही;
19 जिवंत मनुष्य, जिवंत मनुष्य, तोच एक तुझे आभार मानेल, जसा मी आज करीत आहे;
20 “परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे आणि आम्ही आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसात
21 आता यशया म्हणतो, अंजीराची एक चांदकी आणून गळवावर बांधा आणि त्यास बरे वाटेल.
22 हिज्कीया असेही म्हणाला, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय?