1 मवाबाबद्दलची घोषणा.
2 दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले;
3 ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर
4 हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे.
5 मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत.
6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे;
7 यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते,
8 मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे;
9 दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन.