1 त्या दिवशी तू म्हणशील,
2 पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही,
3 तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
4 त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा;
5 परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
6 अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”