Isaías 10

MAR

1 जे कोणी अन्यायकारक कायदे करतात आणि पक्षपाती हुकूम काढतात त्यांना धिक्कार असो.

2 ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात,

3 न्यायाच्या दिवशी जेव्हा विध्वंस दुरून येईल तेव्हा तुम्ही काय कराल?

4 बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही,

5 माझ्या क्रोधाचा सोटा, ज्याचा उपयोग मी काठीप्रमाणे माझा राग व्यक्त करण्यासाठी करतो, त्या अश्शूरास धिक्कार असतो.

6 मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे.

7 परंतु हा त्याचा उद्देश नाही किंवा असे त्याचे विचार नाहीत.

8 तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?

9 कालनो कर्कमीशासारखे नाही काय?

10 मूर्तीपूजक राज्यावर माझ्या हाताने विजय मिळवला आहे, त्यांच्या कोरीव मूर्ती यरूशलेम आणि शोमरोनापेक्षा मोठ्या होत्या.

11 शोमरोन व त्यातील निरुपयोगी मूर्तींचे जसे मी केले,

12 सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.

13 कारण तो म्हणतो, “माझ्या शक्तीने व अकलेने मी वागलो आहे. मी सुज्ञ आहे,

14 पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे,

15 कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय?

16 म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील;

17 इस्राएलाची ज्योती अग्नी होईल, आणि त्यांचा पवित्र प्रभू ज्वाला होईल;

18 परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील;

19 रानात इतके थोडे वृक्ष उरतील की, एखादे मुलदेखील त्यांना मोजू शकेल.

20 त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.

21 याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.

22 कारण जरी तुझे लोक इस्राएल, समुद्रतीरीच्या वाळू सारखे असले तरी त्यांच्यातले बचावलेले तेवढे परत येतील. ओतप्रत भरून वाहणाऱ्या न्यायीपणामुळे विध्वंसाचे फर्मान निघाले आहे

23 कारण सेनाधीश प्रभू परमेश्वर, सर्व भूमीवर नेमलेला विनाश आणण्याच्या तयारीत आहे.

24 म्हणून सेनाधीश प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोननिवासी लोकांनो, अश्शूराला भिऊ नका, तो तुला छडीने मारील व मिसराने केल्याप्रमाणे तुझ्यावर काठी उगारेल.

25 त्यास भिऊ नको, कारण थोड्याच वेळात तुझ्यावरचा माझा राग निघून जाईल व तो त्यांच्या विनाशासाठी पुढे जाईल.

26 मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल.

27 त्या दिवशी,

28 शत्रू अयाथास आला आहे व मिग्रोनातून पुढे गेला आहे;

29 त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे.

30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे!

31 मदमेना पळत आहे,

32 आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल

33 पाहा, सेनाधीश प्रभू परमेश्वर, फांद्या भयंकर रीतीने आदळतील अशा छाटून टाकील;

34 रानातील गर्द झाडी तो कुऱ्हाडीने छाटून टाकील, व लबानोन पराक्रमीच्या हातून पतन पावत आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado