1 नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले,
2 परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे.
3 परमेश्वर महान योद्धा आहे;
4 त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले;
5 खोल पाण्याने त्यांना बुडविले;
6 हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;
7 तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस;
8 तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या.
9 शत्रू म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन;
10 परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायू सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;
11 हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे?
12 तू तुझा उजवा हात उगारला,
13 तू उध्दारलेल्या लोकांस तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस;
14 इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील;
15 मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले.
16 तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,
17 तू तुझ्या लोकांस तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;
18 परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”
19 फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले, या प्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.
20 त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;
21 मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले.
22 मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.
23 तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले.
24 लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”
25 मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.
26 तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे.
27 मग ते एलीम येथे आले; तेथे पाण्याचे बारा झरे होते व सत्तर खजुरीची झाडे होती; तेव्हा लोकांनी तेथे पाण्याजवळ तळ दिला.