1 शौल आणि इतर शत्रू यांच्या हातून परमेश्वराने सोडवल्याबद्दल दावीदाने हे स्तुतिगीत म्हटले;
2 परमेश्वर हा माझा दुर्ग, माझा गड, माझ्या सुरक्षिततेचा आधार.
3 “तो माझा देव माझ्या संरक्षणासाठी मी या दुर्गाच्या,
4 त्यांनी माझी चेष्टा केली, पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला,
5 शत्रूंना माझा जीव घ्यायचा होता.
6 अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते.
7 तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय,
8 तेव्हा धरती डळमळली हादरली स्वर्गाचा पाया थरथरला,
9 त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता.
10 आकाश फाडून परमेश्वर खाली अवतरला.
11 करुबावर आरुढ होऊन तो उडत होता.
12 परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते.
13 त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की,
14 परमेश्वर आकाशातून गरजला.
15 त्याने विजांचे बाण सोडले आणि शत्रूची दाणादाण उडाली.
16 परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले.
17 मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला.
18 शत्रू मला वरचढ होता. त्यांना माझा मत्सर वाटला. शत्रू बलाढ्य होता.
19 मी अडचणीत होतो तेव्हा शत्रूने माझ्यावर हल्ला केला.
20 परमेश्वराचा माझ्यावर लोभ आहे, म्हणून त्याने मला सोडवले.
21 मी केले त्याचे फळ परमेश्वर मला देईल, कारण मी योग्य तेच केले.
22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही.
23 परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी
25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे.
26 एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू.
27 हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस.
28 परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस.
29 परमेश्वरा, तू माझा दीप आहेस.
30 परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो.
31 देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे.
32 या परमेश्वरा खेरीज दुसरा देव कोणता?
33 देव माझा मजबूत दुर्ग आहे.
34 देव मला हरणासारखे वेगाने पळण्यास मदत करतो. तो मला आत्मविश्वास देतो.
35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो.
36 देवा, तूच मला वाचवलेस आणि जिंकायला मदत केलीस.
37 माझ्या पायांत बळ दे,
38 शत्रूंचा नि:पात होईपर्यंत मला त्यांचा पाठलाग करायचा आहे.
39 त्यांचा मी नाश केला. त्यांचा पराभव केला. आता ते शत्रू डोके वर काढू शकणार नाहीत.
40 देवा, युध्दात तू मला वरचढ केलेस.
41 त्यांना मला पाठ दाखवायला लावलेस,
42 शत्रू मदतीसाठी याचना करू लागले.
43 माझ्या शत्रूची मी खांडोळी केली.
44 माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस.
45 आता दूर देशचे लोक माझे ऐकतात
46 भीतीने ते गर्भगळीत होतात.
47 परमेश्वर जिवंत आहे.
48 या देवानेच माझ्या शत्रूंना धडा शिकवला.
49 देवा, तू माझे वैऱ्यांपासून रक्षण केलेस.
50 हे परमेश्वरा, म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन.
51 परमेश्वर राजाला युध्दात विजयी करतो.