1 Crônicas 8

MAR

1 बेला हा बन्यामीनचा ज्येष्ठ पुत्र. आशबेल हा दुसरा आणि अहरह हा तिसरा.

2 चौथा नोहा व पाचवा राफा.

3 आणि बेलाचे पुत्र अद्दार, गेरा, अबीहूद,

4 अबीशूवा, नामान, अहोह,

5 गेरा, शफूफान आणि हुराम हे बेलाचे पुत्र.

6 एहूदाचे पुत्र गिबा येथल्या पितृकुलाचे प्रमुख होते. त्यास पाडाव करून मानाहथ येथे नेले.

7 नामान, अहीया व गेरा यांस त्याने कैदी करून नेले. त्यास उज्जा व अहिहूद हे झाले.

8 शहरयिमाने मवाबात आपल्या पत्नी हुशीम आणि बारा यांना घटस्फोट दिला. यानंतर त्यास दुसऱ्या एका पत्नीपासून अपत्ये झाली.

9 त्याची पत्नी होदेश हिच्यापासून त्यास योबाब, सिब्या, मेशा, मल्काम,

10 यऊस, शख्या, मिर्मा हे पुत्र झाले. ते आपल्या पित्याच्या घराण्यांचे प्रमुख होते.

11 हुशीम पासून शहरयिमाला अबीटूब आणि एल्पाल हे पुत्र झाले.

12 एबर, मिशाम शमेद, बरीया आणि शमा हे एल्पालाचे पुत्र. शमेदने ओनो आणि लोद व त्या आसपासची गावे वसवली.

13 बरीया आणि शमा हे अयालोनमधील घराण्यांचे प्रमुख होते. त्यांनी गथ येथील रहिवाश्यांना हुसकावून लावले.

14 हे बरीयाचे पुत्र:

15 जबद्या. अराद, एदर,

16 मीखाएल, इश्पा, योहा हे बरीयाचे पुत्र.

17 जबद्या, मशुल्लाम, हिज्की, हेबेर,

18 इश्मरय, इज्लीया, योबाब हे एल्पालचे पुत्र.

19 याकीम, जिख्री, जब्दी,

20 एलीएनय, सिलथय, अलीएल,

21 अदाया, बराया, शिम्राथ हे शिमीचे पुत्र

22 इश्पान, एबर, अलीएल,

23 अब्दोन, जिख्री, हानान,

24 हनन्या, एलाम, अनथोथीया,

25 इफदया, पनुएल हे शाशकचे पुत्र होत.

26 शम्शरय, शहऱ्या, अथल्या,

27 यारेश्या, एलीया, जिख्री हे यरोहामाचे पुत्र.

28 हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. ते यरूशलेम येथे राहत होते.

29 गिबोनाचा पिता यइएल. तो गिबोनामध्ये राहत होता. त्याची पत्नी माका.

30 त्याचा ज्येष्ठ पुत्र अब्दोन. सूर, कीश, बाल, नादाब,

31 गदोर, अह्यो, जेखर आणि मिकलोथ ही इतर अपत्ये.

32 शिमा हा मिकलोथचा पुत्र. आपल्या यरूशलेममधील बांधवांच्या जवळच हे सर्व राहत होते.

33 कीशचा पिता नेर. कीश शौलाचा पिता. आणि शौल योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल यांचा पिता.

34 योनाथानाचा पुत्र मरीब्बाल. मरीब्बाल मीखाचा पिता.

35 पीथोन, मेलेख, तरेया आणि आहाज हे मीखाचे पुत्र.

36 यहोअद्दाचे वडील आहाज. यहोअद्दा आलेमेथ, अजमावेथ व जिम्री यांचा पिता होता. जिम्री हा मोसाचा पिता होता.

37 बिनाचा पिता मोसा. बिनाचा पुत्र राफा. राफाचा एलासा. एलासाचा आसेल.

38 आसेलला सहा पुत्र होते. ते म्हणजे अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या, हान.

39 आसेलचा भाऊ एशेक. त्याचे पुत्र: ज्येष्ठ पुत्र ऊलाम, दुसरा यऊश आणि तिसरा अलीफलेत.

40 ऊलामचे पुत्र शूर आणि उत्तम धनुर्धर होते. पुत्र, नातवंडे मिळून दिडशें जण होते. हे सर्व बन्यामीनाचे वंशज होते.

Ler em outra tradução

Comparar lado a lado