1 यहूदानं राजा योथाम आहाज अनं हिज्कीया याना शासन काळमा मीखा मोरष्टी याले देवना वचन प्राप्त व्हयना; शोमरोन अनं यरूशलेम यासनाईषयी त्यानी जे दखात ते हाई शे.
2 सर्व राष्ट्रसवनं, तुम्हीन ऐकी ल्या; हे पृथ्वी तू अनं तुनावरला सर्वा वस्तुजात यासनी कान द्या; प्रभु परमेश्वर, आपला पवित्र मंदिरमाईन प्रभु तुमनाविरूध्द साक्ष दि राहिना शे.
3 कारण दखा, परमेश्वर आपला ठिकाणमाईन येस, खाल उतरस, अनी पृथ्वीना उच्चा स्थळसवर चाली जास.
4 आगनापूढे मेण वितळस किवा उतारनीवर ओतेल पाणी वाही जास तसे पर्वत त्याना खाल वितळी जातस, अनं दरीखोरी फाटी जातस.
5 याकोबना अपराधमुये, इस्त्राएलना घराणाना पातकसमुये हाई सर्वा व्हतं, याकोबना अपराध कोणता? शोमरोन नही शे का? यहूदानी उच्चा स्थान कोणतं? यरूशलेम नही शे का?
6 यामुये मी शोमरोनले शेतमाधला दगडसना ढिगनासारखा करसू; तिले द्राक्षनामळानागत करसू; मी तिना दगड खोरामा फेकी देसू, तिना पाय उघडा करसू, अश प्रभु परमेश्वर सांगस.
7 तिना सर्वा कोरीव मूर्तीसना फोडीसन तुकडा करामा येतीन; तिना व्याभिचारासनी सर्व कमाई अग्नीघाई जाळामा ई; तिना सर्वा मूर्तीसना मी नाश करसू; वेश्याना कमाईघाई तिनी ते मियाडं म्हणीन वेश्यानी कमाई अश त्या पुनरपि व्हतीन.
8 यामुये मी शोक अनं आक्रोश करसू. मी उघडानागडा फिरसू, मी कोल्हासारखा ओरडसू अनं शहामृगनासारखा विवळसू.
9 कारण तिना जखमा बऱ्या नही व्हनारी शेतस; हाई संकट यहूदापावत येल शे, तो मना लोकसनी वेशीपावत, यरूशलेमपावत येल शे.
10 गथ नगरमा हाई समजाडू नका, अजिबात रडू नका; बेथल-अफ्रांत मी धुळमा लोळनु.
11 शाफीरना रहिवाशीणी, बिना कपडासना नंगी व्हईन, लाज सोडीसनी चालती व्हय; सअनानानी रहिवाशीण बाहेर निंघनी नही; बेथ-एसलाना शोक हाऊ तुमना संकटना शेवट नही.
12 कारण मारोथमना लोके आनंदमा चांगली बातमीनी वाट दखी राहिंतात तवयच दु:खमा शेतस, कारण येरुशलेमनी वेशीपावोत परमेश्वरकडीन संकट ई लागेल शे.
13 लाखीशामा राहानारा लोकेसवन, रथले वेगवान घोडासले जोडा; सीयोनकन्येना पापसना सुरवात तिनापाईन व्हयना; कारण इस्त्राएलना अपराध तुना ठाई आढळना;
14 म्हणीन तुले मोरेशथ-गथ सोडीन जातांले देणगी देना पडी; अकजीबानी घरे इस्त्राएलना राजासले फसवनारी व्हतीन;
15 मोरेशमा राहानारा, मी तुले दुसरा वतनदार आणसू; इस्त्राएलना मानपानवाला लोके अदुल्लामना गुफामा येतीन.
16 तुमना प्रिय पोऱ्यासकरता दु:खमां आपला केस कापी टाक अनी गिधाडनामायक आपला डोकानी टकली करी लेय, कारण तुमना पोऱ्या तुमनापाईन गुलाम व्हईसन निंघी जातीन.