1 प्रिय थियफिला,
2 ठिक त्याच गोष्टी ज्या आमले त्या लोकसपाईन मिळेल शेतस अनी ज्यासनी ह्या गोष्टीसले सुरवातपाईनच दखेल व्हतं अनी त्या शुभवर्तमानना प्रचार करनारा व्हतात.
3 यामुये, माले बी वाटस की सर्व गोष्टीसना मुळपाईन नीट शोध करीसन त्या तुमनाकरता एकमांगे एक व्यवस्थित लिखु.
4 ज्यामुये तु त्या गोष्टी खऱ्या शेतस हाई समजी ले ज्यानं तुले शिक्षण देयल शे.
5 यहूदीयाना राजा हेरोद ह्याना दिनसमा अबीयाना याजकवर्गमाधला जखऱ्या नावना एक याजक व्हता. त्यानी बायको अहरोनना कुळमाधली व्हती, तिनं नाव अलीशिबा व्हतं.
6 त्या दोन्ही देवना दृष्टीमा धार्मीक व्हतात अनी प्रभुन्या सर्व आज्ञा अनं विधी खरी भावनातीन पाळाकरता जागरूक व्हतात.
7 अलीशिबा वांझ व्हती म्हणीन त्यासले लेकरंबाळं नव्हतात, त्या दोन्ही म्हतारा व्हई जायेल व्हतात.
8 एकदाव असं व्हयनं की जखऱ्या आपला वर्गणी येळ येवावर देवपुढे याजकनं कामकरी राहींता,
9 तो याजकसना रितप्रमाणे देवना पवित्र मंदिरमा जाईन धुप जाळाकरता चिठ्या टाकीन निवडाई गया
10 धुप जाळाना येळले लोकसनी गर्दी बाहेर प्रार्थना करी राहींती.
11 तवय देवना दूत धुपवेदीना उजवा बाजुले प्रकट व्हयना.
12 त्याले दखीन जखऱ्या घाबरना अनं त्याना थरकाप व्हयना.
13 देवदूत त्याले बोलना, “जखऱ्या, घाबरू नको, कारण तुनी ईनंती ऐकामा येल शे; तुनी बायको अलीशिबा हिनापाईन तुले पोऱ्या व्हई, अनी तु त्यानं नाव योहान ठेव.
14 तुले आनंद अनं उल्लास व्हई अनी त्याना जन्ममुये बराच लोकसले आनंद वाटी.
15 कारण योहान देवना नजरमा महान व्हई, तो ‘द्राक्षरस अनं दारू पेवाव नही,’ अनी तो त्यानी मायना कोखपाईन पवित्र आत्मातीन परीपुर्ण राही,
16 तो इस्त्राएलसना बराच जणसले त्यासना देव प्रभु यानाकडे वळाई;
17 ‘बापसनं मन पोऱ्यासकडे,’ अनी हट्टी लोकसले धार्मीक जणसना ज्ञानकडे फिराईन प्रभुकरता योग्य प्रजा तयार कराले तो एलियानामायक आत्मातीन अनं सामर्थ्यतीन त्यानापुढे चाली.”
18 तवय जखऱ्या देवदूतले बोलना, “हाई कसावरीन समजी? कारण मी म्हतारा शे अनं मनी बायको बी म्हतारी शे.”
19 देवदूतनी त्याले उत्तर दिधं, “मी देवनापुढे उभा राहणारा गॅब्रीएल देवदूत शे, अनी तुनाबरोबर बोलाले अनं हाई सुवार्ता तुले सांगाकरता माले धाडामा येल शे.
20 दख, हाई घडी त्या दिनपावत तु मुका ऱ्हाशी, तुले बोलता येवाव नही; कारण पुर्ण व्हणारं मना वचनवर तु ईश्वास ठेवा नही.”
21 ईकडे लोक जखऱ्यानी वाट दखी राहींतात अनं त्याले पवित्र मंदिरमा उशीर लागामुये त्यासले आश्चर्य वाटनं.
22 तो बाहेर वना तवय त्याले त्यासनासंगे बोलता ई नही राहींत तवय त्यासले समजनं की त्याले पवित्र मंदिरमा दर्शन व्हयेल शे; तो त्यासले इशारा करीसन गप्प राहीना.
23 मंग असं व्हयनं की मंदिरमधला त्याना सेवाना दिन पुरा व्हवावर तो आपला घर गया.
24 त्या दिन नंतर त्यानी बायको अलीशिबाले दिन राहीनात अनी ती पाच महीना दपीन राहीनी.
25 ती सांगे की, “लोकसमा मनी व्हनारी निंदा बंद व्हवाकरता देवनी मनाकडे दखं तवय मनाकरता त्यानी असं करं!”
26 अलिशिबाना सहावा महीनामा देवनी गालीलमधला नासरेथ नावना गावमा एक कुमारीकडे गॅब्रीएल देवदूतले धाडं.
27 तिनी दावीदना वंश मधला योसेफ नावना माणुससंगे मांगनी व्हयेल व्हती, त्या कुवारीनं नाव मरीया व्हतं.
28 तवय देवदूत मझार तिनाकडे ई बोलना, हे कृपा व्हयेल बाई, कल्याण असो! प्रभु तुनासंगे शे, तु धन्य शे.
29 मरीया ते बोलनं ऐकीन भलती घाबरी गई अनी हाई अभिवंदन काय व्हई असा ईचार करू लागनी.
30 देवदूतनी तिले सांगं, “मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे.
31 तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव.
32 तो महान व्हई अनं त्याले परमेश्वरना पोऱ्या म्हणतीन. अनी प्रभु देव त्याले त्याना बाप दावीद ह्यानं राजासन दी,
33 तो याकोबना घरानावर युगानुयुग राज्य करी; त्याना राज्यना अंत व्हवाव नही!”
34 मरीयानी देवदूतले ईचारं, “हाई कसं व्हई? कारण माले पुरूष माहीत नही.”
35 देवदूतनी उत्तर दिधं, “पवित्र आत्मा तुनावर ई अनी परमेश्वरनी शक्ती तुनावर छाया करी, याकरता की, जो जन्मी त्याले पवित्र, देवना पोऱ्या, अस म्हणतीन.
36 दख, तुनी नातलग अलीशिबा हिले बी म्हतारपणमा गर्भ राहेल शे, अनी जिले वांझ म्हणतस तिले हाऊ सहावा महीना चालु शे.
37 अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही.”
38 तवय मरीया बोलनी, “मी प्रभुनी दासी, माले तुना वचनप्रमाणे व्हवो.” अनी देवदूत तिनाकडतीन निंघी गया.
39 त्याच दिनसमा मरीया फटकामा डोंगराळ प्रदेशमातील यहूदा प्रांतना एक गावमा निंघी गयी.
40 जखऱ्याना घरमा जाईन तिनी अलीशिबाले शुभेच्छा दिध्यात.
41 तवय असं व्हयनं की अलीशिबानी मरीयानी देयल शुभेच्छा ऐकताच, बाळनी तिना पोटमा उडी मारी, अनं अलीशिबा पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हयनी.
42 अनी अलीशिबा उच्चा आवाजमा बोलनी, “बायासमा तु धन्य अनं तुनं पोटनं फळ धन्य.
43 मनावर हाई कृपा कशी व्हयनी की, मना प्रभुनी माय माले भेटाले वनी?
44 तुना शुभेच्छाना शब्द मना कानवर पडताच बाळनी मना पोटमा आनंदतीन उडी मारी.
45 जीनी ईश्वास धरा ती धन्य, कारण प्रभुनी तिले सांगेल गोष्टी पुर्ण व्हतीन!”
46 तवय मरीया बोलनी,
47 अनी देव जो मना तारणारा, त्यानामुये मना आत्मा आनंदमा शे,
48 कारण त्यानी आपली दासीवर कृपादृष्टी करेल शे!
49 कारण जो पराक्रमी देव त्यानी मनाकरता महान कार्य करेल शे.
50 ज्या त्याले मानतस
51 त्यानी आपला हातनी पराक्रम करेल शे
52 त्यानी राजासले राजासनसवरतीन काढेल शे,
53 भूक्यासले त्यानी चांगल्या वस्तु दिसन तृप्त करेल शे,
54 त्यानी आमना पुर्वजसंले सांगेल प्रमाणे,
55 त्यानी आमना पुर्वजसले सांगेल प्रमाणे अब्राहाम
56 मंग मरीया जवळजवळ तीन महीना अलीशिबाजोडे राहीन आपला घर परत गई.
57 अलीशिबाना दिन भरणात अनं तिले पोऱ्या व्हयना.
58 प्रभुनी तिनावर मोठी कृपा करी हाई ऐकीन तिना शेजारना अनं नातलग यासनी तिनासंगे आनंद करा.
59 मंग आठवा दिन असं व्हयनं की, बाळनी सुंता कराकरता त्या वनात, अनी त्याना बापना नाववरतीन त्यानं नाव जखऱ्या ठेवणार व्हतात.
60 पण त्यानी मायनी सांगं, “नही! त्यानं नाव योहान ठेवनं शे.”
61 त्या तिले बोलणात, “तुना नातलगसमा हाई नाव कोणच नही शे!”
62 त्यासनी त्याना बापले इशारा करीसन ईचारं, तुनी काय ईच्छा शे त्यानं नाव काय ठेवानं.
63 मंग त्यानी पाटी मांगाडीन त्यानं नाव योहान शे अस लिखं, तवय सर्वासले आश्चर्य वाटणं.
64 त्याच येळले लगेच त्यानं तोंड उघडनं, त्यानी जिभ मोकळी व्हयनी अनी तो देवना आभार मानीन बोलाले लागना.
65 यावर त्यासना आजुबाजू राहनारासमा भिती पसरनी अनी यहूदीया प्रदेशमा पुर्ण डोंगराळ प्रदेशमा या सर्व गोष्टिसबद्दल लोकसमा चर्चा व्हवाले लागनी.
66 ज्यासनी ह्या गोष्टि ऐक्यात त्या सर्व आपला मनमा ईचार करीसन बोलणात, हाऊ पोऱ्या व्हई तरी कसा? कारण प्रभुना हात त्यानावर व्हता.
67 योहानना बाप जखऱ्या ह्यानी पवित्र आत्मातीन परिपूर्ण व्हईसन संदेश दिधा, तो असा;
68 इस्त्राएलसना देव प्रभु, धन्यवादित शे,
69 त्यानी आमनाकरता आपला सेवक
70 जसं की त्यानी सुरवात पाईन आपला पवित्र संदेष्टासद्वारे सांगेल व्हतं.
71 की, आमना शत्रुसपाईन अनी व्देष करनारासना हाततीन
72 यानाकरता की, त्यानी आमना पुर्वजसंवर दया कराले पाहिजे
73 म्हणजे जी शपथ त्यानी आमना बाप अब्राहाम
74 ती हाई की तुम्हीन आपला शत्रुसना हातमातीन सुटीन,
75 मनासमोर पवित्रतातीन अनं धार्मीकतातीन
76 “अनी हे बाळ, तुले परमप्रधान देवना संदेष्टा म्हणतीन,
77 यानाकरता की त्याना लोकसले त्यासना पापना माफीघाई
78 आमना देवना परमकृपातीन हाई व्हयेल शे.
79 ‘यानाकरता की अंधारमा अनं मृत्युना सावलीमा बशेलसले
80 तो बाळ वाढीन आत्मातीन बलवान व्हत गया, अनी इस्त्राएलना लोकसले प्रकट व्हवाना दिनपावत जंगलमा राहीना.