1 देव भुतकाळमा बराचदावं अनं येगयेगळा प्रकारतीन आपला पुर्वजससंगे संदेष्टासनाद्वारा बोलना,
2 तो या शेवटला दिनसमा आपलासंगे आपला पोऱ्याद्वारा बोलेल शे, देवनी त्याले सर्व वस्तुसना वारीस करेल शे अनी त्यानाद्वारा त्यानी सर्व सृष्टी उत्पन्न करेल शे.
3 हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
4 जेवढ पोऱ्याले देवदूतसपेक्षा वारस हक्कतीन श्रेष्ठ नाव भेटेल शे, तेवढाघाई तो त्यासनापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हयना.
5 देवनी कोणता देवदूतले कधी अस सांगं;
6 पण जवय देव आपला जेष्ठ पोऱ्याले जगमा धाडी त्या येळबद्दल तो असं म्हणस;
7 पण देवदूतसबद्दल देव अस सांगस,
8 परमेश्वर, पोऱ्याबद्दल तो अस म्हणस;
9 तु, जे चांगलं शे त्यावर प्रेम अनी जे वाईट शे,
10 तो आखो म्हणस;
11 ते नष्ट व्हई जाई, पण तु कायम राहशी,
12 तु त्यासले सदरानामायक गुंडाळी टाकशी,
13 देवनी कोणता देवदूतबद्दल अस कधी म्हणं;
14 तर देवदूत कोण शेतस? देवदूत देवनी सेवा करनारा आत्मा शेतस अनी तारण भेटणारा लोकसनी मदत कराकरता ते देवनी धाडेल शेतस.