1 Pedro 3

AHR

1 बायासवनं, तुम्हीन तसच आपआपला नवरासना अधीन रहा; यानाकरता की कोणी वचनले अमान्य राही,

2 कारण त्या दखतीन तुमनी वागणुक कशी शुध्द अनी भक्तीपूर्ण शे.

3 तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे;

4 तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे.

5 याप्रमाणे पुर्वी, देववर आशा ठेवणाऱ्या भक्तीमान बायासनी बी आपापल्या नवरासना अधीन राहिसन स्वतःले सुंदर दखाडं

6 जशी सारा आपला नवरा अब्राहामले धनी म्हणीन त्याना आज्ञामा राहिनी; तस तुम्हीन चांगलं करशात अनं कोणती बी भयप्रद गोष्टले नही घाबरशात, तर तुम्हीन सारान्या पोरी बनशात

7 तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.

8 सारांश, तुम्हीन सर्व एकचित्त, अनं समान भावना; एकमेकसवर प्रेम करनारा, दयाळु, नम्र मनना असा व्हा.

9 वाईटबद्दल वाईट, शापनाबद्दल शाप देवु नका; तर उलट आशिर्वाद द्या; आशिर्वाद हाई वतन मिळावाकरता तुमले पाचारण करामा येल शे.

10 कारण शास्त्र म्हणस;

11 त्यानी वाईटना त्याग करीसन चांगलं ते करानं;

12 कारण परमेश्वरना डोया धार्मीकसवर राहतस,

13 जर तुम्हीन चांगला गोष्टीस कराकरता तयार शेतस तर तुमनं वाईट करनारा कोण?

14 अनी जर तुमले धार्मीकपणाबद्दल दुःख सहन करना पडनात, तरी तुम्हीन धन्य; त्यासना भयतीन भिऊ नका अनं घाबरू नका;

15 तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या.

16 ते सदभावतीन द्या; यानाकरता की ज्याबद्दल निंदा व्हस, त्याबद्दल ख्रिस्तमाधली तुमनी चांगली वर्तणुकवर आळ लेणारासनी लज्जित व्हवाले पाहिजे.

17 चांगलं करीसन बी दुःख सहन करानं हाई जर देवनी ईच्छा व्हई तर, वाईट करीसन दुःख सहन करापेक्षा ते बर शे.

18 कारण आपलाले परमेश्वरजोडे लई जावाकरता ख्रिस्तनी बी पापसकरता, म्हणजे नितीमान माणुसनी अनितीमान लोकसकरता एकदाव मरना; तो शरिरना रूपतीन माराई गया अनी अध्यात्मिकपणतीन जिवत कराई गया;

19 त्या आत्माना रूपतीन त्यानी जाईन बंदिशाळामाधला आत्माजोडे घोषणा करी.

20 ह्याच त्या आत्मा व्हतात ज्यासनी नोहाना दिनसमा देवना अपमान करा, ते तारू तयार व्हई राहींत तवय देवनी सहनशीलता वाट दखी राहिंती; तारूमा थोडाच म्हणजे आठ प्राणी पाणीमाईन वाचाडामा वनतात.

21 ते चिन्ह बाप्तिस्माना मायक शे, त्यानाघाई शरिरना मळ दुर कराना नही, तर चांगलं मन ठेवाकरता देवसंगे करार करनं हाई व्हतं; ते तो आते येशु ख्रिस्तना पुनरूत्थानघाई तुमले वाचाडी राहिना.

22 येशु स्वर्गमा जाईसन देवना उजवीकडे बसेल शे; अनी स्वर्गदूत अनी स्वर्गीय अधिकारी अनी सत्ताधीश या त्याना अधीन शेतस.

Ler em outra tradução

Comparar lado a lado